विनेश फोगटची पुरस्कार वापसी, पोलिसांनी रोखल्यामुळे सन्मानचिन्हं कर्तव्यपथावर ठेवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील कारवाईसाठी पैलवानांनी आता शांततेचा मार्ग पत्करला आहे. बजरंग पूनिया, विरेंद्र सिंह यांच्यानंतर आता विनेश फोगट हिनेही तिचे खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केले आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या विनेशला कर्तव्यपथावरच रोखल्याने तिने तिथेच आपली सन्मानचिन्ह रस्त्यावर ठेवली आहेत.

या पुरस्कारांना परत करण्यापूर्वी विनेशने हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या जीवनात येऊ नये, असं म्हटलं होतं. देशातील महिला पैलवानांसाठी हा अतिशय वाईट काळ आहे. महिला पैलवानांना बेटी बचाव, बेटी पढाओच्या जाहिरातींसाठीचे चेहरे म्हणून वापरण्यात आलं, अशी टीका विनेश हिने यापूर्वी केली होती.

विनेशपूर्वी 22 डिसेंबर रोजी बजरंग पूनिया यानेही आपला पद्मश्री सन्मान परत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्याने महिला पैलवानांचा अपमान होत असताना देशात सन्मानित नागरिक म्हणून राहू शकत नसल्याने हा सन्मान परत करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पंतप्रधान निवासस्थानाबाहेर त्याने आपलं सन्मानचिन्ह आणि मानपत्र सोडून दिलं होतं.