मॉब लिंचिंगमुळे जगणं भीतीदायक, नंदिता दास यांचे वक्तव्य

664

मॉब लिंचिंगसारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या घटनांमधील संबंधित सर्वच व्यक्ती या वाईट नाहीत. त्यामध्ये काही चांगल्या असतील. चांगलं कामदेखील करत असतील. तसेच ते सर्वसामान्य नागरिक आहेत. परंतु आपल्याला असं काय होतं, ज्यामुळे अशा उद्रेकातून हिंसा घडते. आजच्या काळात मॉब लिंचिंगच्या हिंसाचाराचे प्रमाण वाढले असून, समाजात भीती निर्माण होत असल्याचे वक्तव्य अभिनेत्री नंदिता दास यांनी व्यक्त केली.

निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यामिळून सार्‍याजणीया मासिकाच्या 30व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेत्री नंदिता दास यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. मासिकाच्या संपादिका विद्या बाळ, डॉ. गीताली वि.मं., प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर, सोनाली दळवी, मंदार जोगळेकर आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगीमिळून सार्‍याजणीया मासिकाचे आणि ईअंकाचे प्रकाशन करण्यात आले.

नंदिता दास म्हणाल्या, ‘आज अशा प्रकारचा समाज निर्माण केला जातोय, ज्यातून लोकांनी एकमेकांना मारल्यास कोणी बोलत नाहीये; परंतु प्रेम करण्यास लोकांना विरोध केला जातोय. स्त्रीला संधीच दिली जात नाही की, तिने स्वत:ला विसरावं की, ती स्त्री आहे. सुंदरतेवरून अनेक मुलींचा आत्मविश्वास ढासळला आहे. ही एक असुरक्षित ऊर्जा असते, जी की, आपण एकमेकांना देत असतो. महिलांनी मिळून काहीतरी करण्याची भाना असते आणि ती खूप महत्त्वपूर्ण असते.

अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. स्वातंत्र्याचे आज प्रचंड महत्त्व आहे, ते जपलं पाहिजे. समविचारी मंडळींनी एकत्रित येऊन काम करणं, सोबत पाऊल टाकणं आज गरजेचं आहे. विद्या बाळ, संपादिका – ‘मिळून सार्‍याजणी

आपली प्रतिक्रिया द्या