
सामना ऑनलाईन । मुंबई
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख फरारी आरोपी नीरव मोदी याच्या कंपनीत सीनियर एक्झिक्युटिव्ह पदावर काम करणार्या विपुल अंबानीला विशेष सीबीआय कोर्टाने आज दिलासा दिला. घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विपुल अंबानीला एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टाने जामीन मंजूर करून त्याची सुटका केली. या घोटाळ्याप्रकरणी अंबानी गेल्या सहा महिन्यांपासून अटकेत होता.
पंजाब नॅशनल बँकेचे तत्कालीन डेप्युटी मॅनेजर गोकुलनाथ शेट्टी यांनी नीरव मोदीला दिलेल्या फसव्या लेटर ऑफ अंडरटेकिंगबद्दल विपुल अंबानीला माहिती होती असा ठपका ठेवत सीबीआयने अंबानी याला अटक केली होती.



























































