आठ जणांनी गायलेले हे गणेश स्तवन पाहिले का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले विरूध्द चित्रपटातील गणेश स्तवन कमालीचे लोकप्रिय झाले होते. ज्या गाण्यांमुळे गणेशोत्सव पूर्ण होत नाही त्यापैकी हे गाणे. हेच गाणे ८ गायकांनी Smule या ऍपच्या माध्यमातून गायले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आठ गायकांपैकी एकही व्यक्ती व्यावसायिक क्षेत्रात गायक नाही.


या गाण्यातील एक कलाकार मंदार करंजवाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते स्वतः डेन्टिस्ट आहेत, मंगेश पारकर हे आर्टिकेक्ट आहेत तर सुविद्या कोरगावर या टेक्सटाईल डिझायनर आणि स्नेहा होले या बोस्टनमध्ये स्थायिक असून पेशाने अणू शास्त्रज्ञ आहेत. तसेच या कलाकारांची वैयक्तिक ओळख नाही. १५ ऑगस्टला अशा एका गाण्यामुळे यांची ओळख झाली आणि गणेशोत्सवासाठी या मंडळीने दुसरा व्हिडीओ बनवला. काही कलाकार अमेरिकेत आहेत, काही देशात स्थायिक आहेत. गेली महिनाभर या गाण्यावर काम करून ही कलाकृती आकाराला आली. सगळ्यांनी आपापला भाग गाऊन तसे रेकॉर्डिंग केली. तुकड्यांत असेले भाग ऍप मध्ये आपोआप सिंक्रोनाईस झाले आणि ही कलाकृती घडली.

ऍप आणि सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांनी या कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.