
कोरोना संकटात लहानमोठे व्यवसाय चालकायला अडचणी येत आहेत. लॉकडाऊनमुळे कामाला पुरेशी माणसंही मिळत नाहीत. त्यामुळे काही ना काही तडजोडी कराव्या लागत आहेत. प्रत्येक वेळी पैसा हवा असे काही नाही, काही केळेला डोकं लढवूनही कामं होतात. त्याला जुगाड असं म्हटलं जातं. फळ व्यापाऱयाकडे काम करण्याऱया एका व्यक्तीने केलेला असाच एक जुगाड सोशल मीडियाकर व्हायरल होत आहे. छोटी फळं आणि मोठी फळं वेगळी करण्यासाठी त्याने आपल्या सुपीक डोक्यातून अनोखी युक्ती लढकली आहे. त्याची भुरळ विदेशातील एका मोठय़ा कंपनीच्या सीईओला पडली आहे.
सिडनी येथील ट्रिनिटी कन्सल्टिंग सर्व्हिसेस कंपनीचे सीईओ आणि ‘लिंक्डइन’ने सन्मानित केलेल्या प्रतिभाशाली व्यक्तींपैकी एक असलेले अँथनी जेम्स यांनी हिंदुस्थानातील ‘त्या’ फळकाल्याचा व्हिडियो नुकताच शेअर केला. व्हिडियोमध्ये फळं वेगळी करण्याची प्रक्रिया सुरू असलेली दिसते. तीन वेगवेगळे बॉक्स ठेवण्यात आलेत. त्यावर दोन लोखंडी रॉड्स आहेत. त्या रॉड्समधून फळे सोडली जातात. सर्कात मोठे फळ शेकटच्या बॉक्समध्ये, लहान फळ त्यामागील बॉक्समध्ये पडते. हा व्हिडियो कोणत्या राज्यातील आहे, हे अद्याप समजलेले नाही. सोशल मीडियावर देशी जुगाडचा हा व्हिडियो गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे.
























































