व्हिडीओ- भाजप मंत्र्याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, डोंबिवली

महाराष्ट्राचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे त्यांच्या शिवराळ भाषेमुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून यामध्ये ते फोनवरून कोणाशी तरी बोलताना दिसत आहे.

गजबजलेल्या रस्त्यावर, आजूबाजूने सामान्य माणसं जात असताना मंत्री शिव्या देत असल्याचं पाहून सगळेजण अवाक झाले होते. त्यांनी फोन नेमका कोणाला लावला होता, समोरच्या माणसाने त्यांचं नेमकं काय बिघडवलं होतं हे मात्र कळू शकलेलं नाही.

या व्हिडीओत रवींद्र चव्हाण काय म्हणाले ते वाचा

माद*#% तुझा बाप बोलतोय, राज्यमंत्री

तुम्ही असं करता का सगळ्यांना?

तुला सांगितलेली समजत नाही का कुठली गोष्ट?

तू सांगतो मला फोन करायला कोळसेवाडीला ?

तू सांग ना तिथून

येतो थांब मी, सांगतो तुला बरोबर

तुझं नाव काय? तुझं नाव काय?