भाजीत पनीर नसल्याने लग्नात राडा, वऱ्हाड्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

लग्न समारंभ म्हटले की सुग्रास जेवण असे समीकरण आहे. लग्नाला गेल्यानंतर वधूवराला भेटून झालं की पाय वळतात ते जेवणाच्या काऊंटरकडे. जेवणात कायकाय आहे, जेवण कसं आहे याची पाहुण्यांमध्ये रसभरीत चर्चा रंगते. आजकाल लग्नाच्या जेवणात पनीरची भाजी ही कॉमन असते. उत्तरेकडे पनीरचे पदार्थ भरपूर खाल्ले जातात. पनीर नसेल तर लग्नाला आलेली मंडळी नाकं मुरडतात.  असा एक प्रकार घडला असून या लग्नात भाजीत पनीर नसल्याने राडा झाला. या राड्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पनीरवरून लग्नाला आलेल्या पाहुण्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे.

एका लग्नात जेवणातील मेन्यूमध्ये पनीरची भाजी होती. मात्र या भाजीत पनीरच नव्हते. त्यामुळे लग्नात आलेल्या पाहुण्यांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की लोकांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. लग्न समारंभातील खुर्च्या एकमेकांवर फेकल्या.पनीरच्या भाजीवरुन हाणामारी होईल याची कल्पाना कोणालाच नव्हती. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी व्हिडोओवर संताप व्यक्त केला आहे.तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहे. याआधी सुद्धा लग्नसमारंभात असे वाद झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत.