
सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडमधील काही जुनी गाणी पुनः पुन्हा चर्चेत येत आहेत. विशेषतः जुन्या गाण्यांवरील डान्स जास्तच व्हायरल होत आहेत. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. यामध्ये मुलीदेखील काही कमी नाहीत. एका व्हायरल व्हिडीओमध्ये एका वस्तीतील काही तरुणी ‘झांझरिया’ या जुन्या हिंदी गाण्यावर सुंदर डान्स करत आहेत. त्यांच्या एकापेक्षा एक भारी डान्स स्टेप्स अन् त्यांच्या चेहऱयावरील हावभाव पाहून कुणीही त्यांचे काwतुक कराल. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gmgjddance या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो ह्युज मिळाल्या असून, मुलींवर कौतुकाचा वर्षाव होतोय.


























































