विराट, रोहित, अजिंक्य मतदानापासून वंचित

616

टीम इंडिया रांचीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱया कसोटीत आपली विजयपताका फडकवायला सज्ज झाली आहे, पण या लढतीमुळे मुंबईकर रोहित शर्मा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि आता मुंबईकर झालेला कर्णधार विराट कोहली हे तिघेही महाराष्ट्र आणि हरयाणातील लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच विधानसभा निवडणुकीतील मतदानाला मुकले आहेत.

रांचीत नवनव्या विक्रमांचे मनोरे रचणारा सलामीवीर रोहित शर्मा आता वांद्रे येथे निवासाला आला आहे, तर अजिंक्य रहाणे प्रभादेवीत राहतो. कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्कासह वरळी सीफेसला राहायला आला आहे. त्याने हरयाणातील गुरुग्राम येथून आपले नाव मुंबईच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्जही राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे, पण अर्जातील चुकीचा पत्ता आणि फोन नंबरवर आयोगाने संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने निवडणूक आयोगाने अद्याप विराटचे नाव मुंबईच्या मतदार यादीत समाविष्ट केलेले नाही. त्यातच तिसऱया कसोटीत खेळत असल्याने रोहित, अजिंक्य, विराट यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाला मुकले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या