
आयसीसीकडून देण्यात येणारे दशकातील सर्वोत्तम संघ व क्रिकेटपटू पुरस्कारांमध्ये हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचाच बोलबाला दिसून आला. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह या टीम इंडियाच्या खेळाडूंनी रविवारी आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी, वन डे व टी-20 संघात स्थान मिळवत हिंदुस्थानी क्रिकेटचा जागतिक क्रिकेटवर असलेला दबदबा दाखवून दिला होता.
आता कर्णधार विराट कोहलीने मानाचा समजला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स अर्थातच दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि दशकातील सर्वोत्तम वन डे खेळाडू या पुरस्कारावरही मोहोर उमटवली. माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्काराचा मानकरी ठरला.

























































