
सामना ऑनलाईन । मँचेस्टर
न्यूझीलंडविरोधातील सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने संपूर्ण देशाला त्याचा धक्का बसला. करो वा मरोच्या सामन्यात टीम इंडियाचा झालेला पराभव हा चाहत्यांसोबतच खेळाडूंच्या देखील जिव्हारी लागला आहे. त्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांसाठी एक भावनिक संदेश शेअर केला आहे.
Firstly I want to thank all our fans who came in huge numbers to support the team. You made it a memorable tournament for all of us & we definitely felt the love showered upon the team. We are all disappointed & share the same emotions as you. We gave everything we had.Jai hind pic.twitter.com/rFwxiUdqK5
— Virat Kohli (@imVkohli) July 10, 2019
‘आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो. तुमच्यामुळे हा दौरा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. टीम इंडियावर असलेले तुमचे प्रेम आम्हाला जाणवत होते. या पराभवाने आम्ही सर्व निराश झालो असून तुमच्यासारखेच भावुकही झालो आहोत. आम्ही आमच्या परिने चांगलं खेळण्याचा प्रयत्न केला. जय हिंद’,असा संदेश विराटने ट्विटरवर लिहला आहे.
न्यूझीलंविरोधातील सामना अखेरच्या षटकांमध्ये गमावल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये बसलेले खेळाडू भावूक होताना दिसले. तसेच स्टेडियममधील अनेक चाहत्यांना देखील त्यांचे अश्रू अनावर झाले होते.
































































