‘तू कोणत्याही गोष्टीची भीक…’, विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्काची पोस्ट व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विराट कोहली याने शनिवारी टीम इंडियाच्या टेस्ट टीमचे कर्णधारपदही सोडण्याची घोषणा केली. प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी अंत असतोच. त्यामुळेच आता हिंदुस्थानी कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आली आहे, असे म्हणत कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. विराटने अचानक टेस्ट टीमचे कर्णधारपद सोडल्याने खेळाडूंसह क्रीडाप्रेमीही अचंबित झाले आहेत. यावर आता कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहिली आहे.

अनुष्का शर्मा हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विराटचा एक हसरा फोटो पोस्ट केला असून त्याखाली कॅप्शन दिले आहे. ‘2014 मध्ये धोनी निवृत्त झाल्यानंतर तुझ्याकडे कर्णधारपदाची धुरा आल्याचे तू सांगितले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी आपण धोनीशीही चर्चा केली. धोनीने तेव्हा बघ आता लवकरच तुझीही दाढी पांढरी होईल असे म्हटले होते. यावर आपण मनमोकळेपणाने हसलो होते. या दिवसानंतर मी तुझ्या पांढरी होत जाणाऱ्या दाढीसह खूप काही पाहिले आहे. मी तुझी प्रगती पाहिली आहे. एक खेळाडू म्हणून आणि कर्णधार म्हणून तू जे काही मिळवले आहे त्याचा मला गर्व आहे. परंतु या काळात तुझ्यात जी प्रगती झाली ते पाहूनही मला अभिमान वाटतो’, असे अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

2014 मध्ये तू एकदम तरुण होतास. चांगला हेतू, सकारात्मकता आणि योग्य लक्ष्य तुम्हाला जिवनात पुढे घेऊन जातात. पुढे जाताना अनेक आव्हानंही असतात. मैदानात आणि मैदानाबाहेरही तू या आव्हानांचा सामना केलास. हेच तर जीवन आहे. हो ना? तू तुझ्या चांगल्या हेतूपुढे कोणत्याही अडथळ्यांना टिकू दिले नाही. तू एक उदाहरण बनला असून विजयासाठी सर्व काही झोकून देत होता. काही पराभवानंतर तुझ्या शेजारी बसून मी तुला अश्रू ढाळताना पाहिलेय. पण तू चुका शोधत राहिलास आणि त्यातून कशी सुधारणा होईल याकडे लक्ष दिलेस. तू असाच आहेस, असेही अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

ती पुढे म्हणाली, दिखावा करणे तुला कधी जनले नाही आणि माझ्या नजरेत हीच गोष्ट तुला महान बनवते. कोणतीही चापलुसी नाही, हाच तुझा खरेपणा आहे. ही बाब प्रत्येक जण समजू शकत नाही. तू परफेक्ट नाहीय, तुझ्याही कमतरता आहे. परंतु तू त्या कधी लपवून ठेवल्या नाहीस. जे योग्य वाटेल त्याची तू नेहमी साथ दिली. तू कोणत्याही गोष्टीची भीक मागितली नाहीस. या पदासाठीही नाही. आपली मुलगी वडिलांचे हे सात वर्ष एक उदाहरण म्हणून पाहील. तू खूप चांगले केलेस, असे म्हणत अनुष्काने लव्हचा इमोजी वापरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

दरम्यान, गत चार महिन्यात विराटने चार टीमचे कर्णधारपद सोडले आहे. टी-20 वर्ल्डकपपूर्वी त्याने टीम इंडियाच्या टी-20 टीमचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. यानंतर काही दिवसात त्याने आयपीएलच्या बंगळुरू संघाचे कर्णधारपदही सोडले. त्यानंतर वन डे टीमचे कर्णधारपदही बीसीसीआयने त्याच्याकडून काढून घेतले. त्यानंतर आता टेस्ट टीमचे कर्णधारपदही त्याने सोडले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)