Ind Vs WI Team India – विराट रोहीतच्या नेतृत्वाखाली खेळणार, T20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजविरूद्ध होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय सामने तसेच T20 सामन्यांच्या मालिकेसाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली असून रोहीत शर्मा हा कर्णधार असेल. विराट कोहली याचेही नाव संघात सामील करण्यात आले असून तो रोहीत शर्माच्या नेतृत्वात या सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. T20 संघात समावेश करण्यात आला असला तरी एकदिवसीय संघातून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला डच्चू देण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह याला दोन्ही मालिकांसाठी आराम देण्यात आला आहे.

T20 सामन्यांसाठी हिंदुस्थानी संघ

रोहीत शर्मा (कर्णधार)
के.एल.राहुल (उपकर्णधार)
इशान किशन
विराट कोहली
श्रेयस अय्यर
सुर्यकुमार यादव
रिषभ पंत (यष्टीरक्षक)
व्यंकटेश अय्यर
दीपक चाहर
शार्दूल ठाकूर
रवी बिश्नोई
अक्षर पटेल
यजुवेंद्र चहल
वॉशिंग्टन सुंदर
मोहम्मद सिराज
भुवनेश्वर कुमार
आवेश खान
हर्षल पटेल

एकदिवसीय सामन्यांसाठी हिंदुस्थानी संघ

रोहीत शर्मा (कर्णधार)
के.एल.राहुल (उपकर्णधार)
ऋतुराज गायकवाड
शिखर धवन
विराट कोहली
सुर्यकुमार यादव
श्रेयस अय्यर
दीप हुडा
रिषभ पंत (यष्टीरक्षक)
दीपक चाहर
शार्दूल ठाकूर
यजुवेंद्र चहल
कुलदीप यादव
वॉशिंग्टन सुंदर
रवी बिश्नोई
मोहम्मद सिराज
प्रसिध कृष्णा
आवेश खान

हिंदुस्थानचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांना दोन्ही मालिकांसाठी आराम देण्यात आला आहे. केएल राहुल हा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून हिंदुस्थानी संघात सामील होणार आहे. रवींद्र जाडेजा हा अजूनही दुखापतीतून पूर्ण बरा झाला नसल्याने दोन्ही मालिकांसाठी त्याची निवड झालेली नाहीये. कुलदीप यादव याचे पुन्हा संघात आगमन झाले असून त्याला एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघात सामील करण्यात आले आहे. रवी बिश्नोई याची पहिल्यांदाच संघात निवड करण्यात आली आहे. दीपक हुडा याचे नाव एकदिवसीय संघात सामील केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

रोहीत शर्मा करणार नेतृत्व

दुखापतीतून सावरल्यानंतर रोहीत शर्मा हा पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला असून त्याच्याकडे संघनेतृत्वाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून रोहीतची ही पहिली एकदिवसीय सामन्यांची मालिका असेल. गेल्या काही दिवसांपासून रोहीत हा पुन्हा फीट होण्यासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत होता. वेस्ट इंडीजचा संघ हिंदुस्थानात येत असून तो 3 एकदिवसीय सामने आणि 3 T20 सामने खेळणार आहे. एकदिवसीय सामने हे अहमदाबादेतील नरेंद्र मोदी मैदानात 6,9,11 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहेत. T20 मालिकेतील सगळे सामने 16,18,20 फेब्रुवारीला कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानात खेळवण्यात येणार आहेत.