किशोरदांच्या बंगल्यात विराट उघडणार रेस्टॉरंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या जादुई आवाजाने आबालवृद्धांना वेड लावणारे दिवंगत गायक किशोरकुमार  यांच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्यात शानदार रेस्टॉरंट उघडण्याची तयारी  टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याने केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. विराटने यासंदर्भात किशोरदांचे कनिष्ठ चिरंजीव सुमितकुमार गांगुली यांच्याशी पाच वर्षांचा करार केला आहे. जुहू तारा रोडवरील किशोरदांच्या ‘गौरी पुंज’ बंगल्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असून विराटचे रेस्टॉरंट पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. 2018  मध्ये हा बंगला वादात सापडला होता. तेव्हा बंगला रेस्टॉरंट खोलण्यासाठी  तीन वर्षांच्या लीजवर देण्यात आला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने  बंगल्याच्या तळमजल्यावर अवैध बांधकामावर आक्षेप घेत  किशोर कुमार आणि  लीना  चंदावरकर यांचा मुलगा सुमितला नोटीसही पाठवली होती.