
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली आपल्या धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो. मात्र गेल्या काही काळापासून विराट खराब फॉर्मचा सामना करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंडियन क्रिकेट प्रीमियर लीग या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत तर तो धावा जमवण्यासाठी अक्षरशः संघर्ष करताना दिसला. मैदानावर त्याची बॅट शांत असली तरी मैदानाच्या बाहेर मात्र तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. विराट कोहलीने नुकतेच सोशल मीडिया साइट असलेल्या इन्स्टाग्रामवर 20 कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. अशी कामगिरी करून त्याने मैदानाबाहेर एक नवीन विक्रमच नोंदवला आहे.



























































