उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 6 ऑगस्टला होणार, त्याच दिवशी निर्णय होणार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याच दिवशी या पदाचा निर्णय होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 19 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

सध्याचे उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. त्याच दिवशी संध्याकाळी या प्रक्रियेचा निकाल जाहीर केला जाील.

उपराष्ट्रपती पदासाठी गुणोत्तरानुसार मतदान घेतलं जातं. मतदार आपल्या प्राधान्यक्रमानुसार पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला 1 आणि दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला 2 असे क्रमांक आपल्या मतपत्रिकेवर लिहितात. त्यानंतर मतमोजणी केली जाते आणि निर्णय जाहीर केला जातो.