
येत्या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे विश्व मराठी संमेलन होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्काराने, तर समारोपाच्या सत्रात अभिनेता रितेश देशमुख यांना ‘कला रत्न’ हा विशेष सन्मान दिला जाईल.
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने विश्व मराठी संमेलन 2025 पुण्यात होत आहे. यानिमित्त संमेलन नगरीला पु. ल. देशपांडे यांचे, तर मुख्य मंचाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली असून उद्घाटन समारंभ शुक्रवारी 11 ते 1 यादरम्यान होईल. या वेळी ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ हा कौशल इनामदार यांचा संगीतमय कार्यक्रम सादर होईल. तत्पूर्वी बालगंधर्व ते फर्ग्युसन कॉलेज अशी शोभायात्रा निघेल. त्यानंतर अभिजात मराठी मान्यवरांचा सत्कार होईल.
शुक्रवार 31 जानेवारी
दुपारी 1.15 ते 2.15 दरम्यान अभिजात मराठी, अभिमान मराठी हा कार्यक्रम होईल. यामध्ये मधु मंगेश कर्णिक, सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे सहभागी होतील. मराठी भाषा आणि प्रसारमाध्यमे, नव्या जुन्यांचे कवी संमेलन, मराठीचा झेंडा अटकेपार, महाराष्ट्राची महासंस्कृती कार्यक्रम होतील.
शनिवार 1 फेब्रुवारी
सकाळी 11 ः प्रशासनातील मराठी भाषा, सहभाग – विकास खरगे, अशोक काकडे, राजीव नंदकर, वैशाली पतंगे, निवेदन किरण पेंद्रे. दुपारी 12 ः समाजमाध्यमांवरील प्रभावी (इन्फ्ल्युएन्सर) व्यक्तिमत्त्व सहभाग – अथर्व सुदामे, रचना रानडे, पवन वाघूळकर, शार्दुल कदम, समन्वयक – सुनंदन लेले. दुपारी 2 वाजता ः विज्ञान तंत्रज्ञानातील मराठीचा वापर सहभाग – डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. सुरेश गोसावी, प्रा. विवेक सावंत, निवेदन – सुधीर गाडगीळ
रविवार 2 फेब्रुवारी
दुपारी 12.30 मराठी भाषा आणि स्त्राr साहित्य, सहभाग, नीलम गोऱहे, मनीषा पाटणकर म्हैसकर, अश्विनी भिडे, प्रतिभा मतकरी, पैयाज शेख, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, निवेदन – उत्तरा मोने. दुपारी 1.30 मराठी भाषा आणि ग्रामीण साहित्य, इंद्रजित भालेराव, कृष्णात खोत, प्रतिमा इंगोले, डॉ. संजीव गिरासे, समन्वय प्रभाकर देसाई. दुपारी 3.30 मराठी भाषा आणि युवक, प्रणव सखदेव, शरद तांदळे, नितीन थोरात, वैभव देशमुख, देवा झिंजाड.