
नगरमध्ये रविवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रिवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने तीन मंत्र्यांचे दौरे नगरमध्ये आयोजित करण्यात आले होते. मात्र, आंदोलकांच्या भीतीने ते अचानकपणे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अधिवेशनातील मंत्र्यांचे फ्लेक्स हटवण्यात आले आहेत.
नगरमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रिवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या बोर्डवर राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, सध्या राज्यामध्ये आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला असून सर्व नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने संतप्त झालेल्या नगरच्या सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रमस्थळी जाऊन या कार्यक्रमाला लावण्यात आलेल्या फ्लेक्स काढून टाकण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सर्व शिक्षकांनीही आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला असून त्यांनी ताबडतोब मंत्र्यांचे फोटो असलेला फ्लेक्स बोर्ड काढून टाकला आहे.
नगरमध्ये रविवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रिवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या त्रैवार्षिक अधिवेशनाला राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार होते. तर फक्त राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा दौरा या कार्यक्रमासाठी अधिकृतपणे देण्यात आला होता. मात्र सध्या महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षण चांगलेच पेटले असल्याने अखेर या तीनही मंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे. अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आता अरक्षणाबाबत संतप्त झालेल्या आंदोलकांची चांगलीच धास्ती घेतली असून याच पार्श्वभूमीवर नगरमधील मंत्री दीपक केसरकर यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
































































