
प्रत्येक रंगात विठ्ठल आणि विठ्ठलात प्रत्येक रंग दडलेले आहेत. दृष्टीपलीकडील सर्व रंग एकत्र करून नेत्रहीनांनी अनोखी रंगगंध वारी साकारली आहे. रंगगंधचे हे गाणे नुकतेच रेकॉर्ड झाले असून त्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नेत्रहीनांना रंगांची दुनिया समजावी म्हणून सुमित पाटील हा कलावंत गेल्या काही वर्षांपासून रंगगंध उपक्रम राबवत आहे. त्याने नेत्रहीनांसाठी खास गंधावरून ओळखता येणारे रंग तयार केले आहेत. त्यामुळे अंध व्य क्ती गंधाच्या सहाय्याने रंग ओळखून चित्र काढू शकतात. उदाहरणार्थ लाल म्हणजे गुलाब, हिरवा म्हणजे तुळस इत्यादी… रंगांच्या एकत्रीकरणातून जो काळा रंग होतो तो विठ्ठलच असतो, अशी संकल्पना या गीतातून मांडण्यात आली आहे. रंगगंध सांगीतिक विठ्ठलाची मूळ संकल्पना सुमित पाटील यांची असून या गीताचे गीतकार नितीन मोकल आहेत. संगीतकार योगीता तांबे असून हे गीत मनश्री सोमण यांनी गायले असून संगीत संयोजन संदेश कदम आणि ध्वनी संकलन शिवहरी रानडे यांनी केले आहे. आकांक्षा काकडे, प्रतीक्षा डोळस, शबनम अन्सारी, काजल कलकार या अंध कलाकारांना घेऊन या गीताचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रीकरणाची जबाबदारी विघ्नेश शिंदे आणि संकलन सौरभ नाईक यांनी केले आहे. त्यांना अमित चिपळूणकर आणि प्रथमेश सावर्डेकर सहाय्य केले आहे.
- रंगगंध हा उपक्रम येत्या काळात देशभरातील नेत्रहीन मुलांपर्यंत पोचवायचा आहे. कोरोना काळात नेत्रहीनांची आर्थिक मिळवत थांबली. त्यांना कलेचे ज्ञान देऊन सक्षम करावयाचे आहे. कोरोना गेल्यानंतर प्रत्येक शाळेत जाऊन चित्रकला, शिल्पकला शिकवायला सुरुवात करण्याचा विचार आहे. रंगगंधचे रंग सगळीकडे पोचकायला सुरुकात केली आहे. रंगगंधची कारी अखंड सुरू राहून प्रत्येक दृष्टीहीन व्यक्तीपर्यंत हा उपक्रम पोहोचाका आणि त्यांनी कलेतून डोळस व्हावे, अशी इच्छा आहे, असे सुमित पाटील याने सांगितले.

























































