तुमचं मोबाईल कनेक्शन बंद होऊ शकतं…का ते वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

जर तुम्ही वोडाफोन, आयडीया, किंवा एअरटेल या कंपनीचे सीम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या कंपन्यांनी नेटवर्कवर दरमहिना 35 रुपयांपेक्षा कमी पैसे खर्च करणाऱ्या ग्राहकांचे मोबाईल कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान याचपार्श्वभूमीवर एअरटेलने नेटवर्कवर 35 रुपयांहून कमी पैसे खर्च करणाऱ्या ग्राहकांसाठी सात नवीन प्लान बाजारात आणले आहेत. तर वोडाफोन आणि आयडीयानेही ग्राहकांच्या खिशाचा विचार करत पाच नवीन प्लान बाजारात आणले आहेत. ज्यात सर्वात स्वस्त रिचार्ज 35 रुपयांचे असणार आहे. सध्या अशा प्रकारे सीम या तिन्ही कंपन्यांचे 15 कोटी ग्राहक असून त्यांना मात्र कंपन्यांच्या या निर्णयामुळे मोठा फटका बसणार आहे.

याबद्दल बोलताना भारती एअरटेलचे प्रमुख गोपाल मित्तल यांनी सांगितले की आमच्या कंपनीचे सीम वापरणारे 33 कोटी ग्राहक आहेत. पण यातील १० कोटी असे ग्राहक आहेत ज्यांचा मोबाईलचा वापर खूपच कमी आहे. हे ग्राहक इनकमिंग कॉल्सवरच अवलंबून आहेत. तर वोडाफोन आणि आयडीयाचे प्रमुख बाले शर्मा यांनी फ्री इमकमिंग वापरणाऱ्या ग्राहकांचीच संख्या अधिक असून हे ग्राहक कधीच रिचार्ज करत नसल्याचे सांगितले. तसेच यामुळे कपंनीला तोटा सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर फक्त इनकमिंक सेवेचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांचे मोबाईल कनेक्शन बंद करणे आवश्यक आहे. पण तसे केल्याने ग्राहकांच्या संख्यत घट होण्याची शक्यता असल्याचेही वोडाफोनने म्हटले आहे.