‘महाराष्ट्र एकीकरण’ची मते वाढल्याने ‘करवे’ला पोटशूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
maharashtra-ekikaran-samiti

मराठी भाषिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची वाढलेली मतांची टक्केवारी पाहून कन्नड रक्षण वेदिकेला मराठी भाषिकांविषयी पुन्हा एकदा पोटशूळ उठले आहे.

बंगळुरू येथील कंठीरवा स्टेडियमवर कोटय़वधी रुपये खर्च करण्याऐवजी उत्तर कर्नाटकातील सत्ताकेंद्र व या भागाच्या विकासाचे होकायंत्र असलेल्या बेळगाव सुवर्ण विधान सौंधच्या प्रशस्त जागेत कर्नाटकच्या नूतन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा व्हावा, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेकडून करण्यात आली आहे.

कर्नाटकात काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात उत्तर कर्नाटकाची मोठी भूमिका आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकाला न्याय मिळेल यासाठी नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा कर्नाटकची उपराजधानी व बेळगाव सुवर्ण विधान सौंधच्या सुमारे दोन लाख नागरिक क्षमतेच्या प्रांगणात घेऊन नवा इतिहास घडवावा, अशी मागणी कन्नड रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी केली आहे.