दगदग संपली, धाकधूक वाढली!

410

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी अक्षरशः जिवाचे रान केले. काँग्रेस आघाडीसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार प्रचार केला. अखेर मतदानाचा दिवस उजाडला. उमेदवारांची दगदग संपली पण, धाकधूक वाढली. आता पुढे काय होणार? मते कुणाच्या पारडय़ात पडणार? मतदारांचा कौल कुणाला मिळणार? अशा अनेक प्रश्नांचे काहूर उमेदवारांसह नेत्यांच्या डोक्यातही माजले नसेल तर नवलच.

सोमवारी मतदारांनीही उत्साह दाखवला. राज्यभरात मतदारांचा चांगला उत्साह दिसला. पावसाने झोडपून काढलेल्या जिह्यांतही चिखलातून वाट काढत मतदान केंद्रांवर पोहोचलेले मतदार दिसले. मुंबईत अनेक मतदान केंद्रांवर चिखल झाला होता. परंतु, मतदारांचा उत्साह कमी नव्हता. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांनीही तरुणांना लाजवेल असा उत्साह दाखवला. निवडणूक आयोगानेही मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती. मतदान शांततेत पार पडले. सकाळी मतदारांची मोठी गर्दी नव्हती. 10 वाजल्यापासून मतदार घराबाहेर पडू लागले. दुपारी कडक उन्हामुळे मतदारांची संख्या रोडावली. पण पुन्हा सायंकाळी 4 ते 5 यावेळेत मतदारांनी मतदान केंद्र गाठले आणि मतदानाला जोरात सुरुवात झाली. अगदी शस्त्रक्रिया झालेल्या मतदारांनीही मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान केले.

आपली प्रतिक्रिया द्या