प्रेमप्रकरणातून मित्रानेच केला मित्राचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाई तालुक्यातील खानापूर येथील वीस वर्षाच्या युवकाचा प्रेमप्रकरणातून त्याच्याच मित्राने इतर साथीदारांच्या मदतीने खून केल्याची घटना उघडकीस आली. अभिषेक रमेश जाधव (वय 20) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्ह नोंदविण्यात आला आला. या घटनेतील आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरु आहे.

रहीम रसूल मुलाणी (वय 20, रा. खानापूर, ता. वाई) याच्यासह त्याचे दोन मित्र (त्यांची नावे समजू शकली नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

खानापूर येथील एका मुलीचे दुसऱया समाजातील मुलाबरोबर मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीच्या नातेवाईकांनी व भावाने संबंधित मुलाला याबाबत समजावून सांगितले होते. तरीही त्या दोघांचे प्रेमसंबंध चालू होते. या कारणामुळे चिडून जाऊन मुलीचा भाऊ रहीम मुलाणी याने आपल्या दोन साथीदारांच्या अभिषेकचा परखंदी माळा येथे त्याचा खून केला.

या घटनेमुळे खानापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर वातावरण निवळले.

दरम्यान, विक्रम मोरे यांनी आपल्याकडे काम करत असलेला अभिषेक जाधव याला रहीम मुलाणी व त्याच्या दोन मित्रांनी जबरदस्तीने दुचाकीवरून घेऊन गेले असल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. तर, शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱयाने रात्री शेतात एक युवक जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशीसाठी काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाई पोलिस अधिक तपास करत आहेत.