
ओपीडीत आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली वॉर्डबॉयला जुहू पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार या मुलासोबत शनिवारी कूपर रुग्णालयातील ओपीडीत आल्या होत्या तेव्हा वॉर्डबॉयने महिलेला मदत करतो असे सांगितले. लवकर वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देतो असे सांगून त्याने महिलेला नकोसा स्पर्श केला.
घडल्या प्रकरणी महिलेने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन केला. फोन केल्यावर काही वेळातच जुहू पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी वॉर्ड बॉयला ताब्यात घेतले. महिलेच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली. या प्रकाराची रुग्णालय प्रशासनदेखील चौकशी करणार आहे.




























































