विद्यार्थ्यांना दिली दिशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहराच्या गजबजाटीपासून कोसो दूर… ना रस्ता, ना दळवळणाचे कोणतेही साधन. घनदाट जंगलातून पायवाट तुडवत आपल्या घरी पोहोचण्याची आस, सोबतच हिंस्त्र्ा प्राण्यांचा धोका अशा प्रतिकूल परिस्थीतीत आपल्या प्रगतीचा ध्यास घेऊन तब्बल पाच किलोमीटर दूर असलेल्या शाळेत विद्यार्थी कसेबसे पोहचतात. वर्धा जिह्यातील नताला गावची ही परिस्थिती. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱया मॅजिक बस या संस्थेने इथली अगतिकता जाणली आणि इथल्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचे ठरले.

प्राथमिक शाळा शिकता येईल एवढंच काय ते इथलं शैक्षणिक धोरण. नताळा गावच्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंतच्या या शाळेत पोहचण्यासाठी एका मोठय़ा दिव्यातून जावे लागत होते. ग्रामपंचायत हद्दीपासून पाच किलोमीटरवर असलेल्या या शाळेत पोहचण्यासाठी जंगलातून पायपीट करावी लागत होती. रस्ते नसल्याने इथले विद्यार्थी गटगटाने शाळेपर्यंत पोहोचत होते. आपल्या मुलाला जंगलातून येता जाता हिंस्त्र्ा प्राण्यांचा धोका होऊ शकतो या भीतीने पालकही मुलांना शाळेत पाठवायला कचरत होते. बऱयाचशा मुलांनी शिक्षणालाच रामराम ठोकला. मॅजिक बस संस्थेने नटाला गावात ‘प्रोजेक्ट दिशा’ हा उपक्रम राबवला. याअंतर्गत सुरूवातीला मुलांना घरापासून शाळेपर्यंत सोडण्यासाठी काही बसेस ठेवण्यात आल्या. सरपंच, ग्रामस्थ, स्थानिक पुढाऱयांच्या सहकार्याने दहा महिन्यांनंतर या प्रोजेक्टला खरी दिशा मिळाली. आणि इथल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या वाटा खुल्या झाल्या. ग्रामस्थांनाही याचा फायदा झाला.

मयुरी ठरली पहिली

घरापासून शाळा दूर असल्याने मयुरीने शिक्षण घेणे सोडून दिले. मात्र मॅजिक बसने तिला योग्य दिशा दिली. अखेर शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न तिला पुन्हा खुणावू लागले. आपल्या चिकाटीच्या जोरावर दहावीला 84 टक्के गुण मिळवत मयुरी नताळे ग्रामपंचायती हद्दीत पहिला क्रमांक मिळवत पास झाली. याकरिता मॅजिक बसच्या प्रतिनिधी वैशाली यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले.

मॅथ्यू स्पेसिए यांनी 1999मध्ये या संस्थेची मुंबईत स्थापना केली. ग्रामीण भागात दळणवळणाअभावी होत असलेल्या समस्या पाहता तेथील विकासाचा टक्काही यामुळे मागे राहिला आहे. मॅजिक संस्था विशेषतŠ लहान मुले तसेच तरुणांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या हेतूने काम करत असते. आतापर्यंत संस्थेने 22 राज्यांतील 81 जिह्यांमध्ये आपल्या विविध योजना राबवल्या आहेत. सवा तीन लाख मुलांना याचा फायदा झाला आहे. हिंदुस्थानबरोबरच नेपाळ, बांगलादेश, म्यानमार येथील मुलांसाठीही ही संस्था काम करते.