
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने पुन्हा एकदा पूर परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागण्याची चिन्हे आहेत. वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरण, बेंबाळ प्रकल्प आणि वेण्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीच्या पात्रात मोठी वाढ होत आहे. वर्धा नदीचे पाणी पुलावरून जात असल्यामुळे कालपासून धानोरा-भोयेगाव-गडचांदूर हा मार्ग बंद आहे. आणि आज सकाळपासून बल्लारपूर-बामनी-राजुरा हा हैद्राबाद- तेलंगणात जाणारा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. यामुळे वर्धा नदी पुलाच्या दोन्ही बाजूस बल्लारपूर आणि राजुरा या दोन्ही शहरात मालवाहू ट्रकच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आज पहाटेपासून पाऊस सुरू झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
वर्धा नदीला आठ दिवसात दुसऱ्यांदा पूर, चंद्रपूर-तेलंगणाला जोडणारा राज्यमार्ग बंद; वाहनांच्या रांगा #chandrapur #Maharashtrarain #saamanaonline pic.twitter.com/Kb1tgF5KLH
— Saamana (@SaamanaOnline) July 28, 2023
पुराचा भीतीने रात्री बारा वाजता गावाकऱ्यांनी जनावरांसह सोडलं गाव
जिल्हात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या भीतीने भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) येथील नागरिकांनी रात्री बारा वाजता गाई, बैलांसह गाव सोडलं. बैलबंडीने घरातील महत्त्वाचे सामान हलविण्यात आले. जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविल्या गेले आहे. पिपरी (देश) गावाला दरवर्षी पुराचा फटका बसतोय. गावाच्या काही अंतरावर वर्धा नदीचे पात्र आहे. गावाचा सभोताल वेकोलीचे मातीचे ढीगारे आहेत. गावाला चारही बाजूनी पाण्याचा वेढा असतो. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने आधीच गाव सोडलं आहे. जिल्ह्यात आता पर्यंत तीनदा रेड अलर्ट चा इशारा देण्यात आले,
























































