शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षावर बलात्काराचा आरोप, कडक कारवाई करण्याची महिलेची मागणी

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि सदस्य वसीम रिजवी यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोपे केला आहे. तसेच रिजवी यांनी आपले अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढून ब्लॅकमेल केले असा आरोपही महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. तर रिजवी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिया वक्फ बोर्डाचे सदस्य रिजवी यांचा ड्रायव्हर आणि त्याची बायको वक्फ बोर्डाच्या कर्मचारी वसाहतीत राहत होते. एके दिवशी रिजवी यांनी रात्री ड्रायवरला काही कामासाठी बहेर पाठवले. ड्रायवर बाहेर गेल्यानंतर ते त्याच्या घरी गेले आणि त्याच्या बायकोवर बलात्कार केला. इतकेच नाही तर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. या फोटोवरून रिजवी आपल्याला ब्लॅकमेल केले आणि लैंगिक शोषण केले असा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली असे महिलेने सांगितले. रिजवी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.

तर दुसरीकडे वसीम रिजवी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अनेक दिवसांपासून काही लोक दहशतवादी आणि कुराणबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून धमकी देत असल्याचे रिझवी यांनी सांगितले. तसेच त्यांचा ड्रायव्हर आपल्या शत्रूंना माहिती पूरवत असल्याने त्याला आपण 11 जून रोजी कामावरून काढून टाकल्याचे सांगितले. आपल्याला बदनाम करण्याचा हा कट असल्याचे रिझवी यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या