
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी इथे अज्ञाताकडून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 1 जण ठार तर पाच जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. हा गोळीबार व्हाईट हाऊसपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर झाला आहे.
#UPDATE One dead, five injured in Washington, D.C. shooting, says Police: Reuters https://t.co/Ry7A55UNGI
— ANI (@ANI) September 20, 2019
गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. मध्यरात्री गोळ्यांच्या आवाजाने स्थानिक नागरिक हादरले. हा हल्ला कुणी केला, किती हल्लेखोर होते, याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. स्थानिक पोलिसांनी गोळीबार झालेल्या परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे.

























































