
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीनगर येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठवाड्यातील सिंचन प्रश्नांबरोबरच इतर महत्वाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. यामध्ये संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांसाठी महत्वाच्या ठरणार्या वॉटरग्रीड प्रकल्प राबवण्याचा आग्रह त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला. या तीन जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प कसा महत्वाचा आहे याची माहिती जयदत्त क्षीरसागरांनी मुख्यमंत्र्यांसमोर विषद केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्पाला नव्या सरकारमध्ये देखील चालना मिळणार असल्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या प्रकल्पामुळे बीड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये कायम पाणी राहणार आहे. त्यामुळे त्याचा मोठा फायदा शेतकर्यांबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी तत्कालीन सरकारने हे पाऊल उचलले होते. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला असून सदरील योजना दुष्काळी जिल्ह्यासाठी महत्वाची आहे. हे निदर्शनास आणून दिले. त्यांच्या मागणीला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित खात्याचे अधिकारी आणि मंत्री यांची बैठक बोलाऊन या संदर्भात आवश्यक तो निर्णय घेऊत असे आश्वासन दिल्याने आता वॉटरग्रीड प्रकल्प वाचणार यामुळे तीन जिल्ह्यातील जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

























































