भायखळा ते फोर्ट विभागात उद्या 24 तास पाणीपुरठा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई विभागातील रहिवाशांना अधिक चांगला पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून डॉकयार्ड रोड येथील नवानगरमध्ये जुनी जलवाहिनी बदलून नवी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार 17 जानेवारीला सकाळी 10 ते गुरुवार 18 जानेवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत ए विभागातील पर्ह्ट, बी विभागातील डोंगरी आणि ई विभागातील भायखळा, आग्रीपाडा विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर जे.जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या विभागातील रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.