
सामना ऑनलाईन । मुंबई
रविवारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडने विश्वचषकावर नाव कोरलं. पण, हा सामना रंगतदार होण्यामागे शेवटची सुपर ओव्हर कारणीभूत होती. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वीच या सुपर ओव्हरचं भाकित एका क्रिकेटपटूने केलं होतं. या क्रिकेटपटूचं नाव जोफ्रा आर्चर. जोफ्राची चार वर्षांपूर्वीची ट्वीट्स पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. आणि त्याला कारणही तसंच आहे.
16 from 6
— Jofra Archer (@JofraArcher) April 13, 2013
Want to go to lords
— Jofra Archer (@JofraArcher) May 29, 2014
Wouldn’t mind a super over
— Jofra Archer (@JofraArcher) July 4, 2015
जोफ्राने 2013, 2014 आणि 2015 या दरम्यान जोफ्राने जी ट्वीट्स केली आहेत, ती पाहिल्यानंतर अनेकांना हेच वाटू शकतं की जोफ्रा एक भविष्यवेत्ता आहे. इतकंच नव्हे तर सुपर ओव्हरखेरीज हिंदुस्थान आणि न्यूझीलंड सामन्यावेळी झालेल्या पावसाचं भाकितही त्याने वर्तवल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

























































