आम्ही भाडेकरू नव्हे, हिंदुस्थानवर आमचा बरोबरीचा हक्क : खासदार ओवैसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

या देशावर आमचा बरोबरीचा हक्क आहे, आम्ही इथले भाडेकरू नाही असे विधान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान मोदींना कुठलीच मनमानी करता येणार नाही असेही ओवैसी म्हणाले आहे. एका सभेत ते बोलत होते.

ओवैसी म्हणाले की, “ज्यांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना 303 जागा मिळाल्या आहेत तर ते मनमानी कारभार करू शकतात, ते आम्ही होऊ देणार नाही. संविधानाचा हवाला देऊन मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, असदुद्दिन ओवैसी तुमच्याशी लढणार. वंचित लोकांच्या न्यायासाठी आपण लढणार.”

तसेच “आम्ही देशाला पुढे नेऊ,  देशाचा विकास करू. इथे आमचा हक्क समान आहे. इथे आम्ही भाडेकरू नसून आम्ही हिस्सेदार राहू असेही ओवैसी यावेळी म्हणाले.”