
वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला. अशा मुलांना धडा शिकवलाच पाहिजे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. घटनेच्या दिवशी मिहिरने बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडले. त्यानंतर तो फरार झाला. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवायला हवे, असे न्या. दीपांकर दत्ता व न्या. ए. जी. मसिह यांच्या खंडपीठाने जामीन फेटाळताना नमूद केले. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर मिहिरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने जामीन नाकारला.





























































