राजनैतिक अंधश्रद्धादेखील दूर करणे आवश्यक, तुषार गांधी यांचे प्रतिपादन

292

विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही तेव्हा त्यांना शस्त्रांनी संपवून टाकणे अशा अस्वस्थ वातावरणातून सध्या आपण जात आहोत. अशा वातावरणातील मळभ दूर करण्यासाठी अंनिससारख्या संस्थांनी आता राजनैतिक अंधश्रद्धादेखील दूर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तुषार गांधी यांनी केले. अंनिसच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनावेळी ते बोलत होते

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उत्तम कांबळे यांनी राजकारण मूल्याधिष्ठत, विवेकाधिष्ठत कसे होईल, लोकशाही कशी वाचेल असा विचार करून अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे सांगितले. महाराष्ट्र स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्र अंनिसची त्या जडणघडणीत 30 वर्षे मोलाची साथ दिली आहे. जादूटोणाविरोधी कायदा आणि जात पंचायत कायदा हे दोन कायदे अंनिसने मंजूर करून घेतल्याचे अविनाश पाटील यांनी यावेळी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या