बुलढाण्यात काँग्रेसचा टी-शर्ट घालून तरुणाची आत्महत्या

1099

बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावात गुरुवारी सकाळी 21 वर्षीय बेरोजगार युवकाने काँग्रेसचा टी-शर्ट परिधान करीत झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सतीश गोविंद मोरे असे या तरुणाचे नाव आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत बुलढाणा जिल्ह्यातील आठवडाभरातील ही आत्महत्येची दुसरी घटना आहे. याआधी रविवारी शेगाव तालुक्यातील सातखेड गावात राजू ज्ञानदेव तलवारे (35) या शेतकऱ्याने भाजपचा टी शर्ट घालून आपले जीवन संपवले होते. राजू कर्जबाजारीपणाला कंटाळला होता.

धाड गावात गुरुवारी आत्महत्या केलेला सतीश हा बेरोजगार तरुण चांगला शिकलेला असूनही अनेक वर्षे बेकार होता. तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होता. त्याच्या पश्चात आई,वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी धाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या