वेब न्यूज – आता विमान उत्पादकांवर चीनची हेरगिरी

1392

 गेल्या काही काळात विविध देशांची सरकारेदेखील हे उद्योग हॅकर्सच्या मदतीने करायला लागलेली आहेत, ज्यामुळे यापुढे न्यूक्लिअर वॉरपेक्षादेखील हे सायबर वॉर अधिक भडकण्याची, जगभरातील अनेक देशांना नुकसान पोचवण्याची भीती सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत. या सुरक्षा तज्ञांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात चीनच्या एका हॅक ग्रुपसंदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. जगभरातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांच्या माहितीवर कायम लक्ष ठेवून असलेला हा चीनचा हॅकर्स गट सध्या चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या हातात हात घालून एका विशेष कामासाठी कार्यरत झाला असल्याचे उघड झाले आहे. बोइंग आणि एअरबससारख्या दिग्गज विमान उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनाशी साधर्म्य असलेल्या आपल्या C919 या विमानाच्या विकासासाठी चीन या हॅकर्स ग्रुपची मदत घेत आहे. Comac C919 या चीनचे स्वतःचे उत्पादन मानले जात असलेल्या विमानाची डेव्हलपमेंट 2008 साली सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात 2017 साली या विमानाने आपले पहिले उड्डाण केले. तंत्रज्ञानातील विविध अडचणी आणि त्यातील विलंबामुळे हा उशीर लागल्याचे मानले जाते. हे विमान जरी चीनचे उत्पादन मानले जात असले तरी त्यातील अनेक महत्त्वाचे भाग हे युरोप आणि उत्तर अमेरिकेतील एरोस्पेस कंपन्यांकडून पुरवले जात असतात. आता याच उत्पादक कंपन्यांना टार्गेट करून, त्यांच्यावर सायबर हल्ले करून या विविध पार्टस्ची माहिती मिळवणे आणि अगदी तसेच पार्टस् आपल्या देशात तयार करणे यासाठी चीनची ही सर्व उठाठेव सुरू आहे हे उघड झाले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या