साप्ताहिक राशिभविष्य- रविवार 03 सप्टेंबर ते  शनिवार 09 सप्टेंबर 2023

>> नीलिमा प्रधान

 

मेष – कामांना दिशा मिळेल

सूर्य, बुध युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. आठवडय़ाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा. कामांना योग्य दिशा मिळेल. आपसांतील गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बुद्धिमत्तेचा वापर करा. धंद्यात भावनेपेक्षा कर्तव्यपालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तीचा सहवास लाभेल. डावपेचाचे मुद्दे तयार ठेवा.

शुभ दिनांक : 4, 5

 

वृषभ – जिद्दीने समस्या सोडवा

चंद्र, शनि लाभयोग, सूर्य, बुध युती. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. जिद्दीने समस्या सोडवा. नोकरीत कामामध्ये सतर्क रहा. धंद्यात लाभ होईल. कौटुंबिक कामे वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टिकोनातून ठेवा. पद मिळण्याची आशा निर्माण होईल. वरिष्ठांची मर्जी पाहून शब्द टाका.

शुभ दिनांक: 7, 8

 

मिथुन –प्रवासात घाई नको

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, सूर्य, बुध युती. कठीण, किचकट कामे पूर्ण करा. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. चांगले परिचय होतील. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढवा. लोकसंग्रह वाढवा. अधिकार लाभतील. स्पर्धेत यश मिळेल. कौटुंबिक कामे होतील.

शुभ दिनांक: 3, 4

 

कर्क –सहकार्य लाभेल

सूर्य, बुध युती, सूर्य, गुरू त्रिकोणयोग. आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील. नवीन परिचय लाभदायक असेल. नोकरीधंद्यात लाभदायक घटना घडेल. दिग्गज व्यक्तींचे सहकार्य लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भाषणाचा प्रभाव पडेल. डावपेच यशस्वी होतील. स्पर्धेत यश मिळेल.

शुभ दिनांक : 3, 4

 

सिंह – नोकरीत वर्चस्व वाढेल

बुध, गुरू त्रिकोणयोग, सूर्य, बुध युती. आठवडय़ाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. नवीन परिचयावर भाळू नका. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात फसगत टाळा. स्पर्धा यशदायी ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या धैर्याचे कौतुक होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : 4, 7

 

कन्या – कायद्याच्या कक्षेत रहा

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र हर्षल युती. आठवडय़ाच्या सुरूवातीला धक्कादाक बातमी मिळेल. नोकरीत अरेरावी नको. कामात चूक टाळा. धंद्यात गोड बोला. पैसा जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांचे फार ऐकू नका. कायद्याच्या कक्षेत राहून वक्तव्य करा. बेकायदेशीर कृत्य टाळा. स्वतची काळजी घ्या. प्रतिष्ठा जपा.

शुभ दिनांक : 7, 8

 

तूळ – रागावर नियंत्रण ठेवा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, सूर्य, बुध युती. कोणतेही किचकट काम रेंगाळत ठेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. दुखापत टाळा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक घटना घडतील. अधिकार मिळतील. लोकसंग्रह वाढेल.

शुभ दिनांक: 4, 8

 

वृश्चिक – प्रयत्नांत सातत्य ठेवा

सूर्य, चंद्र लाभयोग, सूर्य, बुध युती. प्रेमाने वागल्यास न होणारी कामेसुद्धा पार पडतील. प्रयत्नांत सातत्य ठेवा. कायदा मोडू नका. नोकरीधंद्यात नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करण्याची संधी शोधा. योजनांचा पाठपुरावा करा. स्पर्धा सोपी नाही. कौटुंबिक प्रश्नांवर मार्ग शोधावा लागेल.

शुभ दिनांक: 6, 7

 

धनु  – प्रकृतीची काळजी घ्या

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, सूर्य, बुध युती. पोटाची, प्रकृतीची काळजी घ्या. भावनेच्या भरात कोणतीही चूक करू नका. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात फसगत टाळा. भागीदार डावपेच टाकेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. तुमच्याबद्दल असूया वाटेल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला.

शुभ दिनांक : 3, 4

 

मकर – वक्तव्य जपून करा

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र मंगळ त्रिकोणयोग. कोणतेही वक्तव्य करताना उतावळेपणा नको. कायद्याचे उल्लंघन करू नका. धंद्यात नम्रपणे बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहनशीलता, दूरदृष्टिकोन याचा वापर करा. अहंकारयुक्त भाषा दूर ठेवा. तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता. प्रकृतीला जपा.

शुभ दिनांक : 6, 7

 

कुंभ-  फसगत टाळा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, सूर्य, बुध युती. गोड बोलून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न होईल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात धोका स्वीकारू नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे गाजतील. पद मिळेल. लोकांच्या मनात संशय निर्माण होईल. कुटुंबात खर्च, वाद होतील.

शुभ दिनांक : 3, 4

 

मीन – प्रत्येक दिवस यशस्वी

चंद्र, गुरू युती, चंद्र, शुक्र लाभयोग. प्रत्येक दिवस यशस्वी करण्याची जिद्द ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. नम्रता, गोड बोलणे यावर यश अवलंबून असते. नोकरी टिकवा. कामात चूक टाळा. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न होईल. तटस्थ राहून प्रश्न सोडवा.

शुभ दिनांक : 4, 5