साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 3 ते शनिवार 9 जुलै 2022

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – विरोधकांचा त्रास होईल
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. अनेक कामे करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. वरिष्ठांसोबत मैत्रीपूर्ण चर्चा होईल. प्रवासात काळजी घ्या. बुधवार, गुरुवार विरोधकांचा त्रास होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दौऱयात प्रभाव वाढेल. नवीन परिचयामुळे प्रेरणा मिळेल. कौटुंबिक प्रश्न सोडवाल. शुभ दिनांक ः 3, 4

वृषभ- संयम बाळगा
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. सहनशीलता, संयम ठेवल्यास कामे करून घेता येतील. नोकरी, धंद्यात जम बसेल. नवा विचार कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किचकट कामे पूर्ण होतील. वेळेचा वापर करून प्रगतीचा नवा टप्पा गाठू शकाल. कला, साहित्यात यश मिळेल. शुभ दिनांक ः 5, 6

मिथुन – मुद्दे प्रभावी ठरतील
बुध-मंगळ लाभयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. नवीन परिचयावर भाळू नका. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. सहकारी, नेते यांच्याशी सामोपचाराने वागा. योजना गतिमान करता येतील. अधिकारात वाढ होईल. खर्च टाळा. शुभ दिनांक ः 7, 8

कर्क – अहंकारयुक्त भाषा नको
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, चर्चा करताना ताळमेळ सोडू नका. अहंकारयुक्त भाषा त्रासदायक ठरेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जुन्या चुका नव्याने समोर आणण्याचा प्रयत्न होईल. कोर्टाच्या कामात सावध राहा. शुभ दिनांक ः 4, 5

सिंह – प्रश्न रेंगाळत ठेवू नका
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. महत्त्वाची कामे करा. प्रत्येक दिवस आत्मविश्वास देणारा. नोकरीतील कठीण कामे करा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्ञानात नवी भर पडेल. आर्थिक सहाय्य मिळेल. प्रश्न रेंगाळत ठेवू नका. साहित्यात प्रेरणा मिळेल. शुभ दिनांक ः 6, 7

कन्या – प्रवासात सावध राहा
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला मन अस्थिर होईल. प्रवासात सावध राहा. धंद्यात नवा विचार कराल. नोकरीत प्रभाव, चातुर्य यांचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमच्या बाजूने असतील. योजनांकडे लक्ष द्या. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. शुभ दिनांक ः 7, 8

तूळ – रागावर ताबा ठेवा
चंद्र-बुध लाभयोग, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. अडचणीत आलेली कामे करून घ्या. आठवडय़ाच्या मध्यावर रागावर ताबा ठेवा. मनस्ताप होईल. महत्त्वाची वस्तू सांभाळा. व्यवसायात नम्रता ठेवा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामे करून घ्या. शुभ दिनांक ः 3, 4

वृश्चिक – तटस्थ भूमिका घ्या
बुध-प्लुटो षडाष्टक, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग. तुमचे वक्तव्य सत्याला धरून असले तरी विपर्यास केला जाईल. काही प्रश्न तटस्थ राहून सोडवा. चर्चा करताना तारतम्य ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकारयुक्त संभाषण त्रासदायक ठरेल. प्रवासात धोका पत्करू नका. सहकारी मदत करतील. शुभ दिनांक ः 4, 5

धनु – प्रतिष्ठा वाढेल
चंद्र-बुध लाभयोग, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. आठवडय़ात प्रत्येक दिवस यश देणारा. किचकट, कठीण कामे करून घ्या. मोहाला बळी पडू नका. धंद्यात वाढ होईल. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा वाढवणारे पद मिळेल. तुमच्या मुद्दय़ावर वरिष्ठ खूश होतील. कौटुंबिक प्रश्न सोडवा. शुभ दिनांक ः 7, 8

मकर – प्रकृतीची काळजी घ्या
बुध-प्लुटो षडाष्टक योग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग. आठवडय़ाच्या सुरुवातीला समस्या वाढतील. रागावर ताबा ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवताना गोड बोला. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, अपमानाचा विचार करण्यापेक्षा मूळ ध्येयावर लक्ष ठेवा. शुभ दिनांक ः 7, 8

कुंभ – चर्चा सफल होईल
चंद्र-बुध लाभयोग, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. गोड बोलून कोणताही प्रश्न सोडवता येईल. व्यवसायात चर्चा सफल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियता कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करतील. स्पर्धेत टिकून राहाल. घराची कामे निर्माण होतील. शुभ दिनांक ः 4, 9

मीन – नवी संधी मिळेल
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती. या आठवडय़ात अनेक ठिकाणी तडजोड करण्याची वेळ येईल. प्रसंग सावरून घ्या. पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरी, धंद्यात कठीण परिस्थितीवर मात करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन परिचय होतील. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शुभ दिनांक ः 6, 7