साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 7 ते शनिवार 13 ऑगस्ट 2022

>> नीलिमा प्रधान

मेष – निर्णयात सावधगिरी बाळगा
मेषेच्या धनेषात मंगळ, चंद्र, बुध त्रिकोणयोग. मंगळवारपासून कठीण प्रश्नावर तोडगा काढता येईल. प्रत्येक निर्णय, सावधपणे, विचारपूर्वक घ्या. नोकरीधंद्यात अरेरावी घातक ठरेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल. तुमच्यावर आरोप होईल. शुभ दिनांक ः 9, 10

वृषभ – रागावर ताबा ठेवा
स्वराशीत मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. राग व भावना यावर ताबा ठेवा म्हणजे कोणताही प्रश्न सोडवू शकाल. नोकरीत नवी संधी मिळेल. नवीन परिचयावर फार विश्वास ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाचे कार्य करून दाखवा. लोकसंग्रह वाढवा. कौटुंबिक समस्या कमी होतील. शुभ दिनांक ः 7, 11

मिथुन – ठरवाल तसे घडेल
मिथुनेच्या व्ययेषात मंगळ, चंद्र, बुध त्रिकोणयोग. तुम्ही ठरवाल तसे घडवता येईल. विरोधकांना कमी लेखू नका. तुमची चूक दर्शवल्यावर संताप व्यक्त करू नका. नोकरी, धंद्यात काम वाढले तरी वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बुद्धिचातुर्याचा योग्य प्रकारे उपयोग करा. शुभ दिनांक ः 9, 13

कर्क – कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी
कर्केच्या एकादशात मंगळ, शुक्र, नेपच्युन त्रिकोणयोग. तुमचे कार्यक्षेत्र अधिक विस्तारण्याची संधी मिळेल. नोकरीत बढती मिळेल. धंद्यात जम बसेल. कर्जाचे, खरेदी-विक्रीचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, अधिकार, लोकप्रियता वाढेल. संधीचे सोने करा. स्पर्धेत पुढे जाल. शुभ दिनांक ः 7, 11

सिंह – सत्य नाकारू नका
सिंहेच्या दशमेषात मंगळ, चंद्र, बुध प्रतियुती. अहंकार बाजूला सारून कामाला लागा. नोकरीधंदा टिकवणे फार महत्त्वाचे. मौल्यवान वस्तुंची काळजी घ्या. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सत्य नाकारू नका. भ्रमात राहू नका. यश, अपयश सहन करायला शिका. शुभ दिनांक ः 9, 13

कन्या – योजना गतिमान करा
कन्येच्या भाग्येषात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. बोलण्यात वेळ घालवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचे कौतुक होईल. नव्या योजना गतिमान करा. कायद्यानुसार बोला. कुटुंबातील कामे होतील. खरेदी विक्रीत लाभ. शुभ दिनांक ः 10,11

तूळ – गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा
तुळेच्या अष्टमेषात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस यश खेचण्यासाठी उपयोग ठरेल. प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवा. गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात रेंगाळलेली कामे पूर्ण करा. नम्रता, संयम बाळगा. लोकसंग्रह वाढवा. कुटुंबातील कामे करा. शुभ दिनांक ः7, 9

वृश्चिक – नवीन परिचय उत्साहवर्धक
वृश्चिकेच्या सप्तमेषात मंगळ, चंद्र, शुक्र प्रतियुती. तुमचे बोलणे अधिक फायदेशीर ठरेल. नोकरीधंद्यात प्रगती करण्याची संधी मिळेल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिक ताकदीने कार्य होईल. नावलौकिकात भर पडेल. स्पर्धेत जिंकाल. वेळेला महत्त्व द्या. शुभ दिनांक ः 9, 10

धनु – मनस्ताप देणारा काळ
धनुच्या षष्ठsषात मंगळ, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. आठवडय़ाच्या सुरुवातीला गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. भावनेच्या आहारी जाऊन केलेली कृती घातक ठरेल. रागावर ताबा ठेवा. विरोधकांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. कोणतीही गंभीर चूक करू नका. शुभ दिनांक ः 10, 13

मकर – येणे वसूल होईल
मकरेच्या पंचमेषात मंगळ, शुक्र, नेपच्यून त्रिकोणयोग. कठोर बोलणे टाळा. कार्याचा विस्तार करा. कठीण कामे करून घ्या. मागील येणे वसूल करा. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील किचकट कामे करा. लोकसंग्रह वाढवा. मोठे क्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक ताण कमी होईल. शुभ दिनांक ः 11, 13

कुंभ – सत्य-असत्य पडताळा
कुंभेच्या सुखस्थानात मंगळ, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. कोणत्याही प्रकारचा अतिरेक मनस्ताप देणारा ठरतो. याकडे दुर्लक्ष करू नका. साडेसाती सुरू आहे. सत्य-असत्य पडताळून पहा. कामात चूक नको. नोकरीधंदा टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणताही निर्णय घेताना दूरदृष्टिकोन ठेवा. शुभ दिनांक ः 9, 13

मीन- प्रत्येक दिवस महत्त्वाचा
मीनेच्या पराक्रमात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. कठीण काम करा. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. जुने येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे स्थान अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. कायद्याच्या चौकटीत राहून बोला. कुटुंबात आनंदी राहाल. शुभ दिनांक ः 9, 10