साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 04 जानेवारी 2026 ते शनिवार 10 जानेवारी 2026

>> नीलिमा प्रधान

मेष– प्रकृतीची काळजी घ्या

रवि, शुक्र युती. अडचणी आल्या तरी त्यावर कुशलतेने मात करता येईल. प्रकृतीची योग्य काळजी घ्या. नोकरीधंद्यात किरकोळ तणाव, वाद होतील. तुमचा प्रभाव राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक डावपेच टाकतील.

शुभ दि. 7, 8

वृषभ – वेग नियंत्रणात ठेवा

सूर्य, चंद्र षडाष्टक योग. संयम, सातत्य, तत्परता ठेवल्यास यश जिद्दीने मिळवता येईल. कायदा पाळा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. दुखापत टाळा. नोकरीच्या कामात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मतप्रदर्शन करू नका.

शुभ दि. 4, 9

मिथुन – नोकरीत प्रशंसा होईल

शुक्र, गुरू प्रतियुती. प्रत्येक दिवस यशदायी ठरेल. नियोजनबद्ध कार्यपद्धती ठेवा. नोकरीत प्रशंसा होईल. धंद्यात जम बसेल. कर्जाचे काम होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक गोष्टींचा उलगडा होईल. लोकप्रियता वाढेल.

शुभ दि. 5, 7

कर्क – उतावळेपणा नको

शुक्र, मंगळ युती. कोणताही प्रश्न सोडवताना उतावळेपणा, आक्रमक पवित्रा घेऊ नका. कायदा मोडेल असे कृत्य टाळा. प्रवासात धोका होईल. सावध रहा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य उलगडा होईल.

शुभ दि. 5, 7

सिंह- वाद वाढवू नका

सूर्य, शुक्र युती. महत्त्वाच्या प्रश्नांचा प्रथम विचार करा. कठीण समस्या सोडवा. घरगुती वाद वाढवू नका. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात वसुली करा. नवे काम मिळवा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण कामे करा.

शुभ दि. 8, 10

कन्या-  प्रसंगावधान ठेवा

सूर्य, मंगळ युती. क्षेत्र कोणतेही असो प्रभाव टिकवता येईल. थट्टामस्करी करताना प्रसंगावधान ठेवा. तडजोडीचे धोरण यश देईल. धंद्यात सौम्य भाषा वापरा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक वाद वाढवू नका.

शुभ दि. 5, 10

तूळ-  आत्मविश्वास वाढेल

सूर्य, शुक्र युती. सप्ताहाच्या सुरूवातीला कठीण कामे करून घ्या. आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील. राजकीय, सामाजिक वरिष्ठांना खूष कराल. नोकरीधंद्यात आनंदाची बातमी मिळेल. परदेशात जाण्याची संधी.                       शुभ दि. 5, 7

वृश्चिक-  अहंकार दूर ठेवा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. इतरांची मदत महत्त्वाची ठरेल. अहंकार, वाद न करता कठीण कामे करून घ्या. दूरदृष्टी ठेवा. यश खेचा. नोकरीधंद्यात प्रभाव दाखवाल. नविन परिचय फायदेशीर. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सतर्क रहा.

शुभ दि. 5, 7

धनु- कर्जाचे काम करा

सूर्य, मंगळ युती, प्रगतीची उत्तम संधी मिळेल. तणाव होईल. सौम्य धोरण ठेवा. नोकरीधंद्यात दगदग होईल. कर्जाचे काम करा. आत्मविश्वासात भर पडणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता ठेवा.

शुभ दि. 7, 10

मकर – प्रवासात सावध रहा

शुक्र, मंगळ युती. जवळच्या व्यक्तींमध्ये नाराजी होईल. समंजसपणे वागा. प्रवासात सावध रहा. नोकरीधंद्यात फसगत होईल. नविन धोरण ठरवण्याची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दडपण येईल, मन अस्थिर होईल.

शुभ दि. 5, 10

कुंभ –  ध्येयावर लक्ष ठेवा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. किरकोळ समस्या, टिका याकडे लक्ष द्या. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीधंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता इतरांना खुपेल. सौम्य धोरण ठेवा.

शुभ दि. 7, 8

मीन –  प्रगतीची संधी शोधा

सूर्य चंद्र त्रिकोणयोग. साडेसातीचा काळ सुरू आहे. प्रगतीची संधी शोधा व पुढे जा. अनेकांचे सहकार्य मिळवता येईल. नोकरीधंद्यात वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समंजसपणे मुद्दे मांडा. कोणताही तणाव वाढू देऊ नका.

शुभ दि. 5, 10