साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 30 एप्रिल ते शनिवार 6 मे 2023

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – कामाचे कौतुक होईल

मेषेच्या पराक्रमात शुक्र, रवी-बुध युती. आठवडय़ाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव. तुमच्या क्षेत्रात चौफेर प्रगतीची संधी शोधा. नवीन परिचय प्रेरणादायक, उत्साहवर्धक ठरेल. कामाचे कौतुक होईल. धंद्यात फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या डावपेचांना योग्य दिशेने नेता येईल. घरासंबंधी प्रश्न मार्गी लागतील. शुभ दिनांक : 30, 1

वृषभ – प्रतिष्ठा जपा

वृषभेच्या धनेशात शुक्र, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. सहनशीलता, संयम यावर यश खेचता येईल. धंद्यात अरेरावी नको. प्रतिष्ठा जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता, सौजन्य यावर तुमचे महत्त्व टिकेल. वरिष्ठांना दुखवू नका. कोणताही विचार उतावळेपणाने करू नका. शुभ दिनांक : 2, 3

मिथुन – नवी संधी मिळेल

स्वराशीत शुक्र, रवी- बुध युती. प्रत्येक दिवस यशस्वी ठरेल. प्रयत्न करा. तुमच्या क्षेत्रात चमकाल. नोकरीत नवी संधी मिळेल. बढती, बदली होईल. धंद्यात मोठा लाभ होईल. गुंतवणूकदार मिळेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल. जनसंपर्क वाढवा. डावपेच यशस्वी होतील. शुभ दिनांक : 3, 4

कर्क – तणाव वाढवू नका

कर्केच्या व्ययेशात शुक्र, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. मंगळवारपासून तुमच्या कार्याला गती मिळेल. वाद, तणाव वाढवू नका. संधी गमावू नका. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. चांगले संबंध टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. भाषणात प्रभावी मुद्दे मांडाल. व्यवहारात लाभ होईल. शुभ दिनांक : 30, 1

सिंह – धंद्याला कलाटणी मिळेल

सिंहेच्या एकादशात शुक्र, सूर्य-बुध युती. प्रत्येक दिवस तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा आहे. नोकरीतील तणाव, चिंता कमी होतील. नवीन संधी मिळेल. धंद्याला कलाटणी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात एकजूट वाढवून नेटाने प्रगती करा. प्रतिष्ठा वाढेल. घरातील समस्या संपतील. शुभ दिनांक : 2, 3

कन्या – वाद वाढवू नका 

कन्येच्या दशमेशात शुक्र, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. कायदा पाळा. नोकरीत समस्या येतील. वाद वाढवू नका. आठवडय़ाच्या सुरुवातीला चूक करू नका. धंद्यात योग्य व्यवहार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वक्तव्य करताना उतावळेपणा नको. वरिष्ठांची मर्जी राखा. कुठेही अतिरेक करू नका. वृद्धांना जपा. शुभ दिनांक : 4, 5

तूळ – अनेकांचे सहकार्य लाभेल 

तुळेच्या भाग्येशात शुक्र, सूर्य-बुध युती. महत्त्वाची कामे करून घ्या. तुमच्या क्षेत्रातील अडचणी कमी होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत मनाप्रमाणे संधी मिळेल. कामाचे कौतुक होईल. योग्य गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थिती सुधारेल. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढवणारी कायम तत्परतेने करा. शुभ दिनांक : 5, 6

वृश्चिक – अहंकार दूर ठेवा 

वृश्चिकेच्या अष्टमेशात शुक्र, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. कोणतेही काम करताना, व्यवहाराची चर्चा करताना उतावळेपणा करू नका. नवीन परिचय धोकादायक ठरेल. नोकरीत व्याप होतील. प्रकृतीची काळजी घ्या. संयमाने यश खेचा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कारस्थाने होतील. अहंकाराची भाषा नको. शुभ दिनांक : 30, 1

धनु – चर्चेत यश 

धनुच्या सप्तमेशात शुक्र, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. अडचणीत आलेली कामे करा. चर्चेत यश मिळेल. नोकरीत महत्त्वाची कामे करण्याची संधी मिळेल. प्रगतिकारक काम होईल. धंद्यातील तणाव कमी होईल. योग्य गुंतवणूक करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व सिद्ध कराल. स्थान निर्माण कराल. शुभ दिनांक : 2, 3

मकर – ध्येय ठरवा 

मकरेच्या षष्ठेशात शुक्र, सूर्य-बुध युती. वादाचे, तणावाचे प्रसंग येतील. तारतम्य ठेवा. स्वतचे ध्येय ठरवा. विचलित होऊ नका. योग्य गुंतवणूक करा. नोकरी, धंदा टिकवून ठेवा. कामाचे कौतुक होईल. नेटाने प्रगती करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांचा दबाव राहील. कठोर बोलणे टाळा. शुभ दिनांक : 3, 4

कुंभ – वर्चस्व वाढेल 

कुंभेच्या पंचमेशात शुक्र, सूय-चंद्र त्रिकोणयोग, क्षुल्लक तणाव निर्माण होईल. तुमचे वर्चस्व वाढत जाईल. कोणताही किचकट प्रश्न लवकर सोडवा. नोकरीत लोकप्रियता लाभेल. नवीन परिचय प्रेरणादायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यापक स्वरूपाचे कार्य होईल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दिनांक : 4, 5 

मीन – सहनशीलता बाळगा

मीनेच्या सुखस्थानात शुक्र, सूर्य-बुध युती. अडचणी, तणाव यावर मात करून यश मिळवा. अहंकार नको. सहनशीलता बाळगा. नोकरीत धावपळ होईल. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याची रचना करा. मेहनत घ्या. तुमचा प्रभाव वाढत जाईल. पद मिळेल. सहकाऱ्यांशी सामोपचाराने वागा. शुभ दिनांक : 2, 3