
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना आज मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीनंतर पुकारलेल्या पहिल्याच मोठय़ा निदर्शनात तृणमूल काँग्रेसचे 80 पैकी 45 आमदार सहभागी झालेच नाहीत. त्यामुळे बंगालमध्ये नव्या ‘खेला’ची चर्चा सुरू झाली आहे. ममता यांनी आज विधान भवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निवडणुकीनंतर झालेला हिंसाचार व हॉकर्सवरील कारवाईविरोधात धरणे आंदोलन आयोजित केले होते.




























































