#WestBengalElection – अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. अशातच आता अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली होणार आहे. त्यापूर्वीच मिथून चक्रवर्ती यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतली होती. ज्यानंतर मिथुन भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालम विधानसभा निवडणुकीत भाजप मिथुन यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून मैदानात उतरू शकते, अशी शक्यता अनेक राजकीय पंडितांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या