पश्चिम बंगाल पुन्हा हादरले, भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची, त्याच्या गरोदर पत्नीची व आठ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. या हत्येने पश्चिम बंगालच नाही तर संपूर्ण देश हादरला होता.

पश्चिम बंगालमध्ये संघाच्या कार्यकर्त्याची व 8 महिन्याच्या गरोदर पत्नीची हत्या

या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका 55 वर्षीय भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. हराला देबनाथ असे त्या कार्यकर्त्याचे नाव असून शुक्रवारी रात्री त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान भाजपने या हत्येसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे.

‘देबनाथ यांचे किराण्याचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ते दुकान बंद करणार इतक्यात दोन जण तिथे आले. त्यांनी दुकानातून सुका खाऊ घेतला. त्यानंतर देबनाथ दुकान बंद करायला बाहेर आले. त्या दोघांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला व फरार झाले. या हत्येत तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा संशय आहे’, असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष मनोबेंद्रा रॉय यांनी सांगितले.