अनुपम खेर यांच्या डोक्यावर केस उगवतील पण TMC कधीच सत्तेत येणार नाही; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. भाजपने 200 हून जास्त जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या या विजयावर बोलताना पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. ”अनुपम खेर यांच्या डोक्यावर केस उगवतील पण TMC कधीच सत्तेत येणार नाही”, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

”हा विजय जनतेचा आहे. तृणमूल काँग्रेस हरणारच हे पश्चिम बंगालच्या लोकांना माहितच होतं. ते विधीलिखीत होतं. तुम्ही आकाश जमिनीवर आणू शकता. समुद्राला आकाशात नेऊ शकता. अनुपम खेर यांच्या डोक्यावर केस उगवू शकतील पण तृणमूल काँघ्रेस आता पुन्हा कधी सत्तेत येणार नाही. हे शक्यच नाही”, असे वक्तव्य भट्टाचार्य यांनी पीटीआयशी बोलताना केले आहे.