बंगालमध्ये भाजप विरुद्ध भाजप! बाहेरच्यांना तिकीट दिल्याने राडा, कार्यालयाची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपला पक्षांतर्गत बंडाळीने त्रस्त केले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात अनेक मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध भाजपच असे चित्र आहे. आयात केलेल्या बाहेरच्या नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावान कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी राडा घालत भाजप कार्यालयाची तोडफोड केली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने खासदारांना उतरवले. तृणमूल काँग्रेसमधून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या अनेकांना उमेदवारी दिली. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱया भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा स्पह्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा नेत्यांविरुद्ध संताप

जगतादल मतदारसंघात भाजपने अरिंदम भट्टाचार्य यांना तिकीट दिले. भट्टाचार्य हे नुकतेच तृणमूलमधून आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत जगतादल येथील पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
जलपाईगुडीमध्ये भाजपने मातिउर रहमान यांच्या नावाची घोषणा केली. भाजप कार्यकर्त्यांनी विरोध करीत कार्यालयाची तोडपह्ड केली. रहमान हे तृणमूलमधून भाजपमध्ये आले आहेत.
मालंदा येथे गोपाल साहा यांच्या उमेदवारीला विरोध करीत भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, कार्यालय पह्डले.
अलीपुरद्वार विधानसभा मतदारसंघात भाजपने अर्थतज्ञ अशोक लाहिरी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयाबाहेर मोठे आंदोलन केले. अखेर भाजपला लाहिरी यांची उमेदवारी रद्द करीत जिल्हा सरचिटणीस सुमन कांजीलाल यांना तिकीट द्यावे लागले.