निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, भाजप कार्यकर्त्यांवर देशी बॉम्ब हल्ला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय हिंसाचार वाढताना दिसत आहे. दरम्यान, अशाच एका हिंसाचाराची बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील रामपूर गावात देशी बॉम्ब हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सहा जण जखमी झाल्याचे समजते आहे.

वृत्तसंस्था ‘एएनआय’नं दिलेल्या माहितीनुसार, या बॉम्ब हल्ल्यात जखमी झालेले सर्व जण हे भाजप कार्यकर्ते आहेत. एका लग्न सोहळ्यातून परतत असताना त्यांच्यावर टीएमसी कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.


पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात होणार मतदान (294)

  • पहिला टप्पा – 27 मार्च
  • दुसरा टप्पा – 1 एप्रिल
  • तिसरा टप्पा – 6 एप्रिल
  • चौथा टप्पा – 10 एप्रिल
  • पाचवा टप्पा – 17 एप्रिल
  • सहावा टप्पा – 22 एप्रिल
  • सातवा टप्पा – 26 एप्रिल
  • आठवा टप्पा – 29 एप्रिल
आपली प्रतिक्रिया द्या