खळबळजनक! घरात घुसून अभिनेत्रीवर बलात्कार, व्हिडीओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी

1922

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 26 वर्षीय अभिनेत्रीवर तिच्याच घरात घुसून बलात्कार केल्याचा आणि व्हिडिओ शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने जादवपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

पीडित अभिनेत्रीने या प्रकरणी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, बलात्कार प्रकरणातील आरोपी तिचा मित्र असून 5 जुलै रोजी पैसे उधार मागण्याच्या बहाण्याने विजयगड येथील फ्लॅटमध्ये घुसला. फ्लॅटमध्ये अभिनेत्री एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाईलवर व्हिडीओ चित्रित केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करण्याची धमकी दिली, असा आरोप अभिनेत्रीने केला.

समाजातील स्थान आणि लोकलाजेखातर अभिनेत्रीने याबाबत कोणाला सांगितले नाही, मात्र 8 जुलै रोजी तिने पोलीस स्थानक गाठत सर्व प्रकार कथन केला. तसेच मानवाधिकार आयोगासमोर आपली आपबीती ऐकवली. यानंतर आरोपी विरोधात कलम 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी मुरलीधर शर्मा यांनी दिली.

दरम्यान, जादवपूर पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पीडित अभिनेत्रीची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आरोपी अभिनेत्रीच्या परिचयातील आहे. दोघात प्रेमसंबंध असल्याची देखील चर्चा आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या नावाचा खुलासा केलेला नाही. तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या