वेस्ट इंडीजला इतिहास रचण्याची संधी, ३२ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्यासाठी सज्ज

west-indies-world-cup-team

जेसन होल्डरचा वेस्ट इंडीज क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाहुण्या वेस्ट इंडीजने साऊथम्पटन येथे झालेला पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आजपासून मँचेस्टर येथे दोन संघांमध्ये दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या लढतीत वेस्ट इंडीजने विजय मिळवल्यास तब्बल ३२ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका विजय मिळवण्यात त्यांना यश लाभेल. दरम्यान, पहिल्या कसोटीत पराभूत झालेल्या यजमान इंग्लंडसाठी एका दिलासादायक बातमी पुढे आली आहे. स्टार फलंदाज जो रूटचे इंग्लंडच्या संघात कमबॅक होणार आहे. पहिल्या कसोटीत बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ मैदानात उतरला होता.

वेगवान गोलंदाजांना विश्रांती देणार
इंग्लंडला मायदेशात सात आठवड्यांमध्ये सहा कसोटी सामने खेळावयाचे आहेत. यामध्ये वेस्ट इंडीजसह पाकिस्तानविरुद्धही तीन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. यामुळे इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्यापैकी एकालाच संघात स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे जेम्स अॅण्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड, खिस वोक्स यांच्यासह एकाच वेगवान गोलंदाजाचा समावेश संघामध्ये करण्यात येणार आहे.

आजपासून दुसरी कसोटीर्
– इंग्लंड – वेस्ट इंडीज, मँचेस्टर
– दुपारी ३.३० वाजता (हिंदुस्थानी वेळेनुसार)

आपली प्रतिक्रिया द्या