
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीज हा सर्वात धोकादायक संघ असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी व्यक्त केले. ‘आयसीसी’ या संकेतस्थळावर लिहिलेल्या स्तंभात स्टीव्ह वॉ म्हणाले, विंडीज संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहे. कुठल्याही गोलंदाजी आक्रमणावर हल्ला करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळे या संघापासून जरा जपून रहायला हवे. थोडी जरी संधी मिळाली, तर विंडीजचे फलंदाज दे दणादण फटकेबाजी करतात. त्यामुळे या संघापासून जरा जपूनच राहयला हवे. नॉकआऊटमध्ये तरी विंडीजची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.





























































